मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या मुंबई अग्निशमन दल अधिकार्यांच्या भायखळा येथील वसाहतीमध्ये (Byculla Fire Station) आता कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. दोन दिवसांपूर्वी एका अग्निशमन दलाच्या कर्मचार्याच्या 2 कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून या वसाहतीमधील 2 मजले क्वारंटीन करण्यात आले आहेत. दरम्यान आज (16 एप्रिल) मुंबई अग्निशमन दलाच्या चीफ फायर ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्या निकटवर्तीयांचा आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्याचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं समोर आले आहे. या बातमीमुळे सार्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र खबरदारीच्या उपायासाठी दोन मजल्यावरील कुटुंबांना क्वारंटीन करण्यात आलं आहे. सध्या मुंबई शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या बीएमसी वॉर्डच्या यादीमध्ये भायखळा परिसराचाही समावेश आहे.
मुंबई मधील भायखळा परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा चिंतेची बाब आहे. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून आता अग्निशमन दलाकडून दोन मजले क्वारंटीन केले आहेत. सोबतच चीफ फायर ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे सारे कर्मचारी सॅनिटायझेशनचे काम करताना पुरेशी काळजी घेत आहेत. पीपीई कीट परिधान करत आहेत. सोबतच आवश्यक सारी खबरदारी घेतली जात आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात आज 165 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3000 च्या पार.
ANI Tweet
As a precaution,2 floors of the residential building of Byculla Fire Station have been quarantined.All fire brigade staff engaged in sanitisation operation are being provided with PPEs & they are taking stringent precautions while working: Chief Fire Officer, Mumbai Fire Services https://t.co/qbiFhNHiP5
— ANI (@ANI) April 16, 2020
मुंबई शहरामध्ये आज सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, 107 नवे रूग्ण आढळले आहे. धारावी परिसरातही आज 11 नवे रूग्ण आढळले आहेत. दरम्यान राज्यातील आजचा एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 3081 वर पोहचला आहे.