Devendra Fadnavis, Jayant Patil | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई (Mumbai) शरहात ‘फ्री कश्मीर’ (Free Kashmir) पोस्टर झळकल्यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात जोरदार ट्विटरवॉर रंगले आहे. ‘फ्री कश्मीर’ पोस्टरवरुन हे आंदोलन नेमके कोणासाठी आहे. फ्री कश्मीर या घोषणेचा इथे संबंधच काय? अशा प्रकारच्या फुटीरतावाद्यांना मुंबईत आपण सहन कसे करु शकता? असे प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते. फडणवीस यांनी हे ट्विट उद्धव ठाकरे यांना टॅग केले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘फ्री कश्मीर’ पोस्टरच्या मुद्द्यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटरवर चांगलेच ट्विटवॉर पाहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरला उत्तर देताना जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, 'देवेंद्र जी, मुंबईत 'फ्री कश्मीर' चे पोस्टर आझाद मैदानात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात झळकले होते. जम्मू कश्मीरच्या जनतेला सर्व प्रकारचा भेदभाव आणि मोबाईल नेटवर्क बंदी पासून तसेच, केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मूक्त करा असा या पोस्टरचा अरथ होतो. पण, तुमच्यासारखे जबाबदार नेते द्वेशपूर्ण शब्द आणि मार्ग अवलंबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. सत्ता गमावल्यामुळे की स्वत:वरील नियंत्रण गमावल्यामुळे असे होत आहे?' असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला आहे. (हेही वाचा, 'Free Kashmir' या पोस्टरमुळे राजकारण तापले; किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल तर, संजय राऊत यांनीही दिली संतप्त प्रतिक्रिया)

जयंत पाटील ट्विट

देवेंद्र फडणवीस ट्विट

जयंत पाटील यांच्या ट्विटला पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 'मला आपली दया येते. फुटीरतावादी वृत्तीला आता सरकारी वकील मिळाल्याचे दिसते. जयंतराव किमान आपणाकडून तरी व्होट बँकेचे राजकारण व्हावं हे अपेक्षीत नाही. जम्मू-कश्मीरमध्ये कधीच भेदभाव नव्हता. केवळ तिथल्या सुरक्षेसाठी तिथे काही निर्बंध लावण्यात आले आहेत. आम्ही सत्तेत असो किंवा नसो आमच्यासाठी नेहमीच राष्ट्र हेच तत्त कायम राहिले आहे.' देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला आता जयंत पाटील काय उत्तर देणार याबाबत उत्सुकता आहे.