Mumbai LED Traffic Signal Photos (Photo Credit: Vinayak Bhole Tweet)

मुंबईत (Mumbai) मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्निनस, मुबई महापालिका, विधानभवनावर इतर ऐतिहासिक वस्तूंवर महत्वाच्या दिवशी रोषणाई केल्याची आपण पाहिले आहे. मात्र, यापुढे मुंबई रस्ता केवळ एका दिवसासाठी नव्हेतर, दररोज चमकणार आहे. मुंबईतील सिग्नलचा (Mumbai LED Traffic Signal) लूक बदलणार आहे. मुंबईमध्ये प्रयोगिक तत्वावर या बदलला सुरुवात झाली आहे. याच नव्या लूकमधील सिग्नलचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सिग्नलच्या या नव्या लूकला मोठी पसंती मिळाली आहे. या चमकणाऱ्या सिग्नलची सुरुवात वरळी सी फेसवरून करण्यात आली असून लवकरच संपूर्ण मुंबईत एलईडी लाईट्स असणारे सिग्नल लावण्यात येणार आहे.

ट्रॅफिक सिग्नल म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात तीन रंग लाल, हिरवा आणि पिवळा. पिवळ्या किंवा चंदेरी रंगाच्या खांबावर गोल रंगाचा ट्रॅफिक सिग्नल आपल्या सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. मात्र, वरळी सी फेसवरील नवा सिग्नल सर्वांनाच आकर्षित करण्याचे काम करीत आहे. हे देखील वाचा- Mumbai Police: मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 जानेवारीपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स यांसारख्या उपकरणाच्या वापरावर बंदी

फोटो-

Mumbai LED Traffic Signal (Photo Credit: Vinayak Bhole Tweet)

फोटो-

Mumbai LED Traffic Signal (Photo Credit: Vinayak Bhole Tweet)

फोटो-

Mumbai LED Traffic Signal (Photo Credit: Vinayak Bhole Tweet)

याआधी चेन्नईमधील अशाप्रकारच्या एलईडी लाईट्स असलेल्या एका सिग्नलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी अनेक लोकांनी या सिग्नल मोठी पसंती दर्शवली होती. सध्या मुंबईत एकाच ठिकाणी एलईडी लाईट्स असेलेला सिग्नल लावण्यात आला आहे. मात्र, लवकरच संपूर्ण मुंबईत एलईडी लाईट्स असलेला सिग्नल पाहायला मिळणार आहे.