Mumbai Police: मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 जानेवारीपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स यांसारख्या उपकरणाच्या वापरावर बंदी
Mumbai Police| Representational Image (Photo Credits: ANI)

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात (Mumbai Police Commissionerate) 29 जानेवारीपर्यंत ड्रोन (Drones), पॅराग्लायडर्स (Paragliders), रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट (Micro Light Aircraft), एरिएल मिसाईल (Aerial Missiles) आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश तोडणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधयेक 1960 च्या कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. येत्या 26 जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रजाकसत्ताक दिनानिमित्त मुंबई पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी अनेक राजकीय कार्यक्रम पार पडतात. यामुळे ड्रोन, पॅराग्लायडर्स यांसारख्या उपकरणाच्या वापरावर बंदी घालण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे देखील वाचा- Mumbai LED Traffic Signal: मुंबईचा रस्ता आणखी चमकणार; सिग्नलचा नवा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, पाहा फोटो

ट्विट-

यापूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. 26 जानेवारी 2002 पासून यात बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.