Mumbai Traffic Police: मुंबईत फुटपाथवर बाईक (Bike)पार्ककरून पादचाऱ्यांचा रस्ता ब्लॉक करू पाहणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ नुकताच एका विदेशी पर्यटक महिलेने एक्सवर पोस्ट केला होता. त्याची दखल घेत मुंबई ट्राफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) बाईकस्वारावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांनी कलम 122/177 एमव्हीए अंतर्गत दुचाकीस्वारावर कारवाई केली आहे. हिल रोड येथे व्होडाफोन दुकानाशेजारील या घटनेचा व्हिडीओ महिलेने पोस्ट केला. त्याशिवाय, दुचाकीस्वाराच्या कृतीवर संतापही व्यक्त केला. व्हिडीओ सुरू असतानाच त्याला वारंवार विनंतीकरून बाईक फुटपाथवरून (Footpath)खाली उतरवायला लावली. (हेही वाचा:Mumbai Traffic police: कायदा मोडणाऱ्या दुचाकीस्वारांकडून मुंबई वाहतूक पोलीसांनी वसूल केला मोठा दंड)
Action has been taken against the Vehicles under section 122/177 MVA .
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 28, 2024
सोबत महिलेने लिहिले की, 'फुटपाथ ड्रायव्हिंग/पार्किंगसाठी नसून पादचाऱ्यांसाठी आहे. ही माहिती लोकांना देण्याचा आणखी एक दिवस. लोकांना कायद्याचा अनादर करण्यात इतका अभिमान का वाटतो? याचा मला सर्वात जास्त धक्का बसला. शिवाय, भारतीय नेहमी इतरांना म्हणतात की, "भारतात तुमचे स्वागत आहे" हेच तुम्हाला जगाला दाखवायचे आहे?',अशी संतापजनक पोस्ट महिलेने एक्स शेअर केली.