मुंबई मध्ये रोड शो नंतर आता दादर च्या शिवाजी पार्क मैदानामध्ये 17 मे दिवशी महायुती 'जाहीर सभा' घेणार आहे. या सभेच्या मंचावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार आहेत त्यामुळे या सभेबाबत कमालीची उत्सुकता आहे. सभेच्या निमित्ताने अनेक VVIPs ची ये जा असल्याने मोठी वाहतूक कोंडी होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून ट्राफिक मध्ये काही बदल केले आहेत. ही नियमावली आज 16 मे रात्री 10 वाजल्यापासून 17 मे च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू असणार आहे.
नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर मनसे कडून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचा लोकसभा निवडणूकीमध्ये उमेदवार नसला तरीही महायुतीला त्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे.
१७ मे २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित 'जाहीर सभा' मध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी १० ते रात्री १२ दरम्यान करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाची नागरिकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/L8saD9UYYR
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 16, 2024
मोदींच्या शिवाजी पार्क सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीतील बदल
नो पार्किंग झोन कोणते?
SVS रोड: बाबा साहेब वरळीकर चौक (सेंच्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन.
संपूर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क, दादर.
संपूर्ण एम बी राऊत मार्ग, शिवाजी पार्क दादर.
पांडुरंग नाईक मार्ग (रस्ता क्र. 5) शिवाजी पार्क, दादर.
दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी प्राक, दादर.
लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्रमांक 4 ते शितलादेवी रोड, शिवाजी पार्क, दादर.
एल जे रोड: गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहीम.
एन सी केळकर रोड: हनुमान मंदिर जंक्शन ते गडकरी जंक्शन, शिवाजी पार्क, दादर.
टी एच कटारिया रोड - गंगा विहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहीम.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोंड : माहेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व).
टिळक रोड: कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर.ए. किडवाई रोड, माटुंगा (पूर्व).
खान अब्दुल गफारखान रोड: सीलिंक रोड ते जे. के. कपूर चौक ते बिंदू माधव ठाकरे चौकापर्यंत.
थडाणी रोड : पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक.
डॉ ॲनी बेझंट रोड: पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ नारायण हर्डीकर जंक्शन
महाराष्ट्रामध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान 20 मे दिवशी होणार आहे. तत्पूर्वी मोदींची ही भव्य सभा होत आहे. काल मुंबई मध्ये रोड शो दरम्यान देखील अनेक ठिकाणी वाहतूक बंद ठेवल्याने सामान्य नागरिकांचे संध्याकाळच्या वेळेस घरी परतत असताना हाल झाल्याचं चित्र बघायला मिळालं आहे.