Central Railway | Photo Credits: Twitter/ Central Railway

कल्याण डोंबिवली दरम्यान आज विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. दरम्यान ठाकुर्ली स्थानकामध्ये गर्डर टाकण्याचं काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आलं होतं. हे काम मध्य रेल्वेकडून वेळेत पूर्ण करण्यात आलं आहे. तसेच कल्याण आणि डोंबिवली स्थानकामधू ट्रेन्स रावाना करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज सकाळी पॉवर ब्लॉक घेतल्याने प्रवाशांची स्थानकांवर तोबा गर्दी पहायला मिळाली होती. दरम्यान या पॉवर ब्लॉकदरम्यान पर्यायी सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान मध्य रेल्वेने ट्वीटरच्या माध्यमातून वेळेत गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झाल्याचे सांगत लवकरच रेल्वेसेवा सुरळीत केली जाईल अशी माहिती दिली आहे. सध्या लांब पल्ल्याच्या आणि लोकल सेवा हळूहळू पूर्ववत केल्या जात आहेत. कल्याण-डोंबिवली मधील रेल्वे वाहतूक आज 4 तास राहणार बंद; असा करा प्रवास

मध्य रेल्वेचं ट्वीट

मध्य रेल्वेच्या या पॉवर ब्लॉकमुळे सीएसएमटी-पुणे सिंहगड, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी-मनमाड पंचवटी, सीएसएमटी-मनमाड राज्यराणी, दादर-जालना जनशताब्दी, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.