लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) साठी देशभरात झालेल्या मतदानाची मतमोजणी (Vote Counting 2024) उद्या म्हणजे 4 जून 2024 रोजी पार पडत आहे. सहाजिकच ही मतमोजणी मुंबई शहरातही पार पडेल. प्राप्त माहितीनुसार, ही मतमोजणी गोरेगाव पूर्व येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात (Nesco Exhibition Centre) होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने (Mumbai Traffic Police) वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. त्याबाबत एक नियमावली आणि काही निर्बंध जारी (Mumbai Traffic Advisory Issued for June 4) केले आहेत. त्याबाबतचे एक निवेदनही पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया मंच X वर प्रसिद्ध केले आहे. जाणून घ्या लोकसभा निकालादिवशी मुंबईतील वाहतुकीचे व्यवस्थापन कसे असेल.
शंकरवाडी ते दहिसर चेक नाका खासगी वाहनांना प्रवेशबंदी
दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांनी नुकत्याच केलेल्या ट्विटनुसार, शंकरवाडी ते दहिसर चेक नाका दरम्यानच्या रस्त्यावर 4 जून रोजी सकाळी 6.00 ते संध्याकाळी 7.00 पर्यंत खाजगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करण्याचा आहे.
मुख्य रहदारी निर्बंध आणि पर्यायी मार्ग:
प्रतिबंधित क्षेत्रे: वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जेकोच जंक्शन ते नेस्को गॅप जंक्शनपर्यंतचा नॉर्थ बाउंड सर्व्हिस रोड, निवडणूक आयोग, अधिकारी आणि मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी वगळता सर्व वाहनांसाठी बंद असेल.
निर्बंध वेळा: हे निर्बंध 4 जून 2024 रोजी सकाळी 5:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत लागू केले जातील.
पर्यायी मार्ग:
- जयकोच जंक्शन वेस्टर्न एक्स्प्रेस वे, नॉर्थ बाउंड सर्व्हिस रोड मार्गे नेस्को गॅपकडे जाणाऱ्या वाहनांनी नेस्को गॅप येथे जयकोच जंक्शन स्लिप रोडने डावीकडे वळावे.
- मृणालताई गोरे जंक्शनकडून जयकोच जंक्शनकडे येणाऱ्या वाहतुकीने मृणालताई गोरे जंक्शनवर उजवे वळण घ्यावे आणि मृणालताई गोरे पुलावरुन दक्षिणेकडे महानंदा जंक्शनकडे जाणारा U-टर्न घ्यावा, त्यानंतर स्लिप रोडने जयकोच जंक्शनकडे जावे.
'नागरिक आणि अधिकाऱ्यांनी सूचनांचे पालन करवावे'
पूर्व उपनगरी मुंबई विभागाचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) राजू भुजबळ, जे पश्चिम उपनगरी मुंबई वाहतुकीचे प्रभारी देखील आहेत,त्यांनी मुंबईतील वाहतूक बदल आणि निर्बंधांबाबत बोलताना मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वाहतूक सुरळीत राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या उपाययोजनांच्या महत्त्वावर भर दिला. रहिवासी आणि प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे मुंबई पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार नियोजन करावे आणि अधिकाऱ्यांनीही जारी केलेल्या वाहतूक सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात त्यांनी केले. मुंबई वाहतूक पोलीस परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करतील आणि वाहनचालकांना प्रतिबंधित झोनमध्ये नेव्हिगेट करण्यात मदत करतील, असेही त्यांनी सांगितले.
एक्स पोस्ट
In view of the vote counting Centre at Nesco Exhibition Centre, to ensure smooth vehicular traffic, private buses & heavy vehicle entry are banned on 4th June 2024 from Shankarvadi to Dahisar Check Naka from 6 am to 7 pm.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/yJzALC8UGe
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) June 2, 2024
पोलिस उपायुक्त, पश्चिम उपनगरीय वाहतूक यांच्या कार्यालयाकडून अधिकृत प्रेस नोट, तपशीलवार वाहतूक व्यवस्थापन धोरणांची माहिती देते. नेस्को एक्झिबिशन सेंटरमधील मतमोजणी, ज्यामध्ये तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवार, समर्थक, मीडिया कर्मचारी आणि आपत्कालीन सेवा वाहने दाखल होती. परिणामी या परिसरात कडक रहदारी उपायांची आवश्यकता निर्माण होते.