मुंबई: तिरूपती बालाजी मंदिराच्या पवित्र धाग्यावरून कलिना परिसरात हाडाच्या सापळ्याची ओळख पटवण्यात यश
Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

मुंबई मध्ये कलीना (Kalina) परिसरात 21 वर्षीय व्यक्तीच्या सापळा आढळला होता. आता प्रसिद्ध तिरूपती मंदिराच्या (Tirupati Temple) धाग्यावरून ओळख पटवण्यास पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पास्कल चौक ( Pascal Square)  परिसरात हाडाच्या सापळ्यांचे अवशेष मिळाले. त्यानंतर बेपत्ता तरूणाचा शोध सुरू झाला.

दरम्यान 10 दिवसांपूर्वी ही व्यक्ती गायब असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यान जेव्हा तक्रारीशी निगडीत व्यक्तींना हाडाच्या सापळ्याची ओळख पटवण्यास बोलावण्यात आले तेव्हा तेव्हा त्यांनी तिरूपती बालाजी मंदिर मधील त्याच्या हातावरील धागा आणि घड्याळ ओळखले.

वाकोला पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक भरत सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाडाचा सापळा आणि त्याची ओळख पटवणार्‍या व्यक्तीचा डीएनए एकमेकांशी जुळला आहे. सध्या याप्रकरणी अकस्मित निधन बाबत तक्रार नोंदवून त्याचा तपास सुरू झाला आहे.