हार्ट अटॅक Photo Credits Pixabay

ठाण्यामध्ये एका जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसात अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रतीक परदेशी असे या तरुणाचे नाव आहे. तीन हातनाका येथील एका जिममध्ये व्यायामासाठी प्रतीक कधीतरी जायचा. तसेच जिमचा हा जुना सदस्य असला तरीही त्याच्या व्यायामामध्ये दिवसांदिवसांचे अंतर पडत होते. शुक्रवारी प्रतिक जिममध्ये पाणी पिण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परंतु रुग्णालयत उपचार करण्यापूर्वीच प्रतिकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तसेच जिममध्ये अतिव्यायाम केल्यामुळे रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊन त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे नेहमी जिममध्ये गेल्यास व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी वॉर्म अप करणे अत्यावश्यक असते असे सांगितले जाते.