मुंबईतील (Mumbai) बोरिवली (Borivali) रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थांसाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अशा फेरीवाल्यांबद्दल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
अन्न आणि औषध प्रशासनातील (Food and Drug Administration) शैलेश यादव यांनी फेरीवाल्यांचा एक व्हिडिओ काढला आहे. त्यामध्ये बोरिवली रेल्वे स्थानकाच्या येथे असणाऱ्या फेरीवाल्यांकडून टॉयलेटच्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्याचसोबत इडली बनवण्यासाठी ज्या पद्धतीची चटणी दिली जाते त्यासाठी खासकरुन हे टॉयलेटचे पाणी येथील फेरीवाले वापरत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.(Video: रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी बनवण्याचा किळसवाणा प्रकार; दुकानदारावर कारवाई)
Shailesh Adhav, Food and Drug Administration (FDA), Mumbai, on video of a street-food vendor using tap water from a toilet at Borivali Railway Station to make 'chatni' for 'Idli': We'll conduct an enquiry against him as well as others who use such methods to do business pic.twitter.com/kdQdpetL0D
— ANI (@ANI) May 31, 2019
त्यामुळे अशा घाणेरड्या पद्धतीने खाद्यपदार्थ बनवणाऱ्या अन्य फेरीवाल्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. तसेच टॉयेलच्या पाण्याचा वापर हा खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येत असल्यास पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.