Mumbai Local | Representational Image | (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील सायन-माटुंगा (Sion-Matunga) दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने दगड भिरकवल्यामुळे दरवाजात उभी असलेली महिला जखमी झाले आहे. कांचन शेलार असे या महिलेचे नाव असून याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कांचन शेलार या काल सकाळी पावणे दहाच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातून सीएसटीएम कडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्या. नेहमीच्याच गर्दीमुळे इतर महिलांसह त्या देखील दरवाजात उभ्या होत्या. सायन रेल्वे स्टेशन पार केल्यानंतर अचानक महिलांच्या डब्याच्या दिशेने दोन दगडं भिरकावण्यात आली. दगडं कांचन यांना लागली आणि त्या जखमी झाल्या. त्यांच्या खांद्याला आणि गुडघ्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर दादर रेल्वे स्थानकात उतरुन त्यांनी प्रथमोपचार घेतले.

या प्रकारामुळे मुंबई लोकल दरम्यान महिला प्रवाशांची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.