Mumbai: धक्कादायक! बेडरूममध्ये कॅमेरा लपवून पतीने शूट केले पत्नीचे Private Videos, मित्रांसोबतही केले शेअर; गुन्हा दाखल  
Hidden Camera in Bedroom (Photo Credit: Pixabay)

महिलांचे आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याच्या अनेक घटना कानी येत आहेत. सरकारने याबाबत कठोर कायदे करूनही अशा गोष्टींना चाप बसला नाही. आता दक्षिण मुंबई (South Mumbai) येथून असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका 32 वर्षीय व्यावसायिकाने आपल्या बेडरूममध्ये कॅमेरा लपवून ठेवला होता. त्याद्वारे त्याने आपल्या पत्नीचे व्हिडिओ शूट केले व नंतर ते मित्रांसमवेत शेअर केले. याबाबत पत्नीने डीबी मार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सोमवारी व्यावसायिकाला अटक करण्यात आली.

ही व्यक्ती एक लहान प्रिंटिंग प्रेस चालवत आहे. या दोघांची एका मॅट्रिमोनियल साईटवर भेट झाली होती त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये लग्न केले. आपल्या तक्रारीत महिलेने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले की, तिला आपल्या बेडरूममध्ये एक लपवलेला कॅमेरा आढळून आला आणि त्यानंतर तिच्या मनात पतीबाबत संशय निर्माण झाला. 8 जानेवारी, 2021 रोजी तिने आपल्या पतीचा फोन तपासला असता तिला धक्काच बसला. कारण तिच्या पतीने बेडरूममधील सर्व प्रायव्हेट व्हिडीओज आपल्या मित्रांशी शेअर केले होते. मित्रांनीही पतीसोबत नग्न फोटोज शेअर केले होते. (हेही वाचा: Pune: महिला डॉक्टरच्या बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावणारा गजाआड, पुण्यातील घटना)

महिलेने 11 जानेवारी 2021 रोजी आपल्या सासरच्या लोकांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर रागाच्या भरात नवऱ्याने इतर सर्व प्रायव्हेट संभाषणे आणि फोटोज आपल्या मित्रांसोबत शेअर केले व पत्नीला जे करायचे आहे ते कर असे सांगितले. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची, माहिती डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांनी दिली. डीबी मार्ग पोलिसांनी 10 जुलै रोजी भारतीय दंड संहितेचे कलम 500 आणि 509 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ई) आणि 67 (ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.