Mumbai Shocker: मुंबईतील वांद्रा येथे सिगारेट ओढण्यापासून रोखले म्हणून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील अंधेरीतील डी. एन नगर परिसरात एका अल्पवयीन मुलावर चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवल्याची घटना घडली आहे. अंगावर शिंकला म्हणून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. सद्या पीडित मुलावर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीने पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना 27 डिसेंबरच्या संध्याकाळी घडली आहे. (हेही वाचा- धक्कादायक, सिगरेट ओढण्यास मनाई केल्याने वाद टोकाला पेटला, मुंबईत एकाची हत्या)
अंगावर शिंकला म्हणून
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सध्यांकाळी पीडित मुलगा नमाजसाठी जातो सांगून घरातून बाहेर पडला. काही वेळ बाहेर मित्रासोबत खेळत होता त्यानंतर रडत रडत घरात आला. त्यावेळी त्याचा चेहरा आणि कानाचा काही भाग जळला होता. हे पाहून आजी घाबरली आणि आजीने तात्काळ मुलाला कुपर रुग्णालयात दाखल केले. या संदर्भात मुलाला विचारणा केली असता एका मुलाने चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची माहिती दिली. यानंतर आजीने पोलिस ठाण्यात आरोपी मुलाविरोधात तक्रार दाखल केली. मुलाविरोधात डी.एन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
गुन्हा दाखल
पीडित मुलाच्या सांगण्यावरून, घराबाहेर मित्रासोबत फोनमध्ये गेम खेळत असताना, आरोपी मुलगा त्याच्याजवळ आला काही वेळानंतर पीडितेला शिंका आली तो आरोपी मुलाच्या अंगावर शिंकला. या गोष्टीचा मनात रागत धरत आरोपी मुलाने घरातून लायटर आणि सॅनिटायझर आणले आणि पीडित मुलाच्या कानावर आणि चेहऱ्यावर टाकले आणि लायटरने पेटवले. ही घटना पाहून जवळ असलेल्या स्थानिकांनी पीडित मुलाच्या अंगावर पाणी ओतले आणि त्याचे प्राण वाचवले. या घटनेत पीडित गंभीर झाला. आजीने मुलाविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.