Mumbai Shocker: मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान शहरातील वांद्रे येथील परिसरात मध्यरात्री एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सिगारेच ओढण्यापासून रोखले म्हणून चोकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. शफीक फर्नांडिस असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी 27 डिसेंबरच्या रात्री घडली आहे. (हेही वाचा- मांजामुळे हवालदाराचा मृत्यू, मुंबई पोलिसांची कारवाई, 19 गुन्हे दाखल)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फर्नांडिस आपल्या कुटुंबासोबत समारंभातून घरी जात होता वांद्रे पश्चिम रोड येथील टोनी स्टोअर्ससमोर आरोपी साद इक्बाल शेख सिगारेट ओढत होता. त्याच्यासोबत आणखी तीन जण होते. शेख याने मुद्दाम फर्नाडिस याच्या मुलीकडे सिगारेटचा धुर सोडला. त्यावेळी त्यांची मुलगी जियान फर्नांडिस हिने सिगारेटच्या धूरचा त्रास होत असल्याचे सांगितले. या गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला आणि संतापलेल्या शेखने फर्नांडिस यांच्यावर चाकून वार केला. फर्नांडिस यांच्या अंगावर अनेक वेळा वार केला. त्यानंतर मुलगी जियानला देखील मारून टाकण्याची धमकी दिली.
घटनास्थळावरून आरोपी फरार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मुलीने आणि आईने फर्नांडिस यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शेखला वांद्रे जेजे कॉलनीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली आणि इतर आरोपी फरार आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.