Mumbai News: मुंबईत काही दिवसांपूर्वी मांजामुळे एका पोलिसांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली. अलीकडे मांजामुळे लोक जखमी आणि मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली. आणि गेल्या दोन दिवसांत 19 गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आले आहे. बंदी असताना देखील नायलॉन मांजा वापरण्याचे प्रमाण वाढत चालेल आहे अशी माहिती अधिकाऱ्यांने दिली. (हेही वाचा- दुचाकीची तोडफोड करणारे दोन पोलिस निलंबित; लातुर मधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल)
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला उड्डाणपुलावरून दुचाकीने जात असताना मांजा गळात अडकला आणि दुचाकीचा अपघात झाला यात दुचाकीवर असलले पोलिस कॉन्स्टेबर यांचा मृत्यू झाला. पोलिस कॉन्स्टेबर समीर जाधव यांचा मृत्यू झाला. हे खेरवाडी पोलिस ठाण्यात हद्दीत कामाला होते. या घटनेनंतर खेरवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द भारतीय दंड कलमाअंतर्गत 304 अ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर मुंबई पोलिस खात्यात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेनंतर पोलिसांनी चायनीज मांजा विक्री व खरेदी करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु केली आहे.
नायलॉनच्या मांजा उडवणाऱ्या दोन भावांना खेरवाडी पोलिसांनी पकडले आहे. तसेच दुकानदाराला अटक केली आहे. बांगूर नगर पोलिसांनी एका ५६ वर्षीय महिलेला मांजा विकण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याप्रकरणी ताब्यात घेतले. याशिवाय, दिंडोशी पोलिसांनी 19 वर्षीय व्यक्तीवर, मालवणी पोलिसांनी 36 वर्षीय व्यक्तीवर आणि सहार पोलिसांनी 70 वर्षीय व्यक्तीवर मांजा विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सर्व आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.