Latur News: दुचाकीची तोडफोड करणारे दोन पोलिस निलंबित; लातुर मधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

लातूर जिल्ह्यातील लोककला केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या काही दुचाकींची तोडफोड केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटने प्रकरणी सोमवारी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Latur News: दुचाकीची तोडफोड करणारे दोन पोलिस निलंबित; लातुर मधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Latur Video PC Free Press Journal

Latur News: लातूर जिल्ह्यातील लोककला केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या काही दुचाकींची तोडफोड केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटने प्रकरणी सोमवारी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले  आहे. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कैमरात कैद झाली आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे दोन पोलिस कार मधून उतरले आणि औसा तहसीलमधील शिंदाळा गावाच्या हद्दीतील लोककला केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या दुचाकींना लाथ मारून आणि तोडफोड करताना दिसले. ही घटना 20 डिसेंबरच्या  मध्यरात्री घडली आहे. या संदर्भात सहाय्यक पोलिस निरिक्षक बाळासाहेब डोंगरे हे तपास करत आहे. या घटनेअंतर्गत पोलिस कर्मचारी सहाय्यक उपनिरिक्षक आणि पोलिस नाईक यांना निंलबित केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2023 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).