Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अपक्ष खासदार नवनीत राण (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) नोटीस बजावली आहे. जामीन देताना घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आपल्यावर आरोप आहे. त्यामुळे आपला जामीन रद्द का करु नये? तसेच आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करु नये? असा प्रश्न विचारत न्यायालयाने राणा दाम्पत्याकडे खुलासा मागितला आहे. सरकारी वकीलांनी सत्र न्यायालयात राणा दाम्पत्याविरुद्ध अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावरुनच न्यायालयाने या दाम्पत्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हनुमान चालीसा प्रकरणात राणा दाम्पत्याला कोर्टाने जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने विविध अटीही घालून दिल्या होत्या. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी सातत्याने विविध वक्तव्ये करुन या दाम्पत्याने या अटींचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सरकारी पक्षाने केली आहे. याबाबत सरकारी पक्षाने दिलेल्या आर्जावरुन न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. (हेही वाचा, Navneet Rana: खासदार नवनीत राणा आज दिल्लीत, अमित शहा आणि लोकसभा अध्यक्षांची घेणार भेट)

राणा दाम्पत्यास दिलेल्या नोटीशीवर सुनावणी केव्हा होणार याबाबत मात्र माहिती समजू शकली नाही. दरम्यान, खासदार नवनीत राणा आज दिल्लीला गेल्या आहेत. त्यांनी संसदीय समितीची भेट घेतली असून, त्यांच्या तक्रारीवर लवकरच सुनावणी घेतली जाणार असल्याचे समजते.