Mumbai Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू, आरोपी मोहन चौहान याला अटक
Marital Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई येथील साकिनाका बलात्कार (Mumbai Sakinaka Rape Case) प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला आहे. मुंबई (Mumbai) येथील राजावाडी रुग्णालयात ( Rajawadi Hospital) पीडितेचा मृत्यू झाला झाला आहे. आरोपीने बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकले होते. त्यामळे महिलेची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती. तिच्यावर होणाऱ्या कोणत्याच उपचाराला तिचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. तरीही डॉक्टरांचे एक पथक तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर तिच्या मृत्यूची बातमी आली. या घटनेमुळे दिल्ली येथील निर्भया (Nirbhaya) प्रकरणाची पुन्हा एकदा भयावहता पुढे आली आहे.

साकिनाका बलात्कार प्रकरणात मृत्यू झालेली महिला अवघी 32 वर्षांची आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना 10 सप्टेंबरला पुढे आली होती. मुबईतील साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली. मोहन चौहान असे आरोपीचे नाव आहे. पोलिस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. अद्याप पर्यंत तरी आरोपीने पोलिसांना तपास आणि चौकशीत योग्य ते सहकार्य केल्याचे वृत्त नाही. त्यामुळे पोलीस आता पुढील तपास कसा राबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात इतरही काही आरोपी आहेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत. (हेही वाचा, Mumbai Rape: मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात घातला लोखंडी रॉड, पीडिताची प्रकृती चिंताजनक)

पीडित महिलेच्या प्रकृतीबाबत माहिती देताना राजावाडी रुग्णालयाच्या डीन डॉ विद्या ठाकूर यांनी म्हटले होते की, पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. तिची प्रकृती थोडीफार सुधारली तर तिला इतर रुग्णालयात दाखल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, सध्यास्थितीत पीडितेची अवस्था पाहता तिला इतर रुग्णालयात हालविण्यासारखी स्थिती नाही.

दरम्यान, या प्रकरणानंत महिलांवरीलअत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विरोधकांनी सरकार आणि पोलिसांवर टीका केली आहे. राजकीय वर्तुळातून प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया येत आहेत. आरोपीला कठोर शिक्षा करा आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल याचा विचार व्हावा, अशी भावना या मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.