मुंबई मध्ये मागील 2 दोन दिवसांपासून सतत पाऊस बरसत आहे. त्याचा परिणाम रस्ते वाहतूकीवर झाला आहे. आजही मुंबई मध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड (Mulund) मध्ये भरधाव वेगात येणार्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून डिव्हायडर वर धडक बसून टेम्पो (Tempo) पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालक जागीच ठार झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून टेम्पो बाजूला करण्याचे काम सुरू झाले आहे. जसा दिवस सुरू होईल तशी आता वर्दळ वाढणार असून हळूहळू ट्राफिकची समस्या वाढण्याची शक्य्ता आहे. दरम्यान कालच ठाण्यात एका बाईकस्वाराचा रस्त्यातील खड्ड्यांनी जीव घेतला आहे. नक्की वाचा: Maharashtra Rain Update: मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग, कोकणाला पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट .
मुंबई सह कोकण, मध्य महाराष्ट्राला पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाचे आहेत. असा इशारा देण्यात आला आहे. या पावसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच हे सर्वाधिक सक्रिय मान्सूनचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. पावसामुळे कमी होणारी व्हिजिबिलिटी आणि खड्डेमय रस्त्यामधून मार्ग काढणं कठीण असल्याने सावकाश वाहनं चालवण्याचादेखील सल्ला देण्यात आला आहे.