मुंबई मध्ये कांदिवलीत Hiranandani Estate Society च्या रहिवाशांनी केले Fake COVID-19 Vaccines मिळाल्याचा दावा; पोलिस तपास सुरू 2 जण ताब्यात
Vaccination | Representative Image (Photo Credits: Pixabay)

कोरोनाला रोखण्यासाठी कोविड 19 लसीकरण आवश्यक असल्याचं सांगितलं जात असताना आता याचमधून मुंबईर एक कोविड 19 लसीकरण घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान मुंबईच्या कांदिवली भागात असलेल्या Hiranandani Estate Society मध्ये राहणार्‍या नागरिकांनी त्यांची लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिस तपास सुरू असून 2 जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. खाजगी हॉस्पिटलच्या मदतीने हे लसीकरण झाल्याचं सांगण्यात आले होते पण संबंधित हॉस्पिटल्सनी आमच्याकडून असे लसीकरण झालेच नसल्याचं सांगण्यात आल्याने आता फसवणूक झाल्याचा अंदाज आणि लस घोटाळा झाल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. नक्की वाचा: COVID Vaccination In Mumbai: मुंबई मध्ये लवकरच सोसायट्यांमध्येच थेट मिळणार कोविड 19 ची लस; 'या' असतील अटी!

दरम्यान ANI सोबत बोलताना, Hiren Vohra या रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, 30 मे 2021 दिवशी सुमारे 390 जणांचे वॅक्सिनेशन झाले. दरम्यान या व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह नंतर कोणालाच पोस्ट वॅक्सिनेशन लक्षणं दिसली नाही. तसेच रहिवाश्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या नावे, वेगवेगळ्या तारखांनी सर्टिफिकेट्स मिळायला सुरूवात झाली. नंतर याच हॉस्पिटलने त्यांनी ही सर्टिफिकेट्स दिलीच नसल्याचं सांगितलं.

Kokilaben Hospital चं स्टेटमेंट

मीडीया रिपोर्ट्सनुसार, एक व्यक्ती सोसायटीच्या संपर्कात होता त्याने आपण इतर सोसायट्यांसोबत करार केला असल्याचा दावा केला. या व्यक्तीने तो Kokilaben Ambani Hospital चा प्रतिनिधी असल्याचेही सांगितलं. या व्यक्तीसोबत अजून 2 जण सहभागी झाले होते. कोविशिल्ड डोसच्या नावाखाली प्रत्येकी 1260 असे 390 जणांसाठी अंदाजे 5 लाख रूपये गोळा केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कोकिलाबेन हॉस्पिटल कडूनही स्टेटमेंट जारी करत खोट्या व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह पासून दूर रहा असा सल्ला देण्यात आला आहे.