मुंबई: रक्षाबंधनासाठी एसटीकडून विशेष वाहतूकीची सोय, जादा बसेस सोडणार
ST Bus (Photo Credits: Twitter)

उद्या 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त एसटी महामंडळाकडून विशेष वाहतुकीची सोय करण्यात आली आहे. एसटीच्या प्रत्येक विभागतील नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याचसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांची या दिवसात नियुक्ती करुन प्रवाशांना एसटी बसने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांकडे जातात किंवा भाऊ बहिणीकडे राखी बांधण्यासाठी येतात. यामुळे प्रवास करण्यासाठी प्रवाशांची गर्दी दिसून येते. याच पार्श्वभुमीवर एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Raksha Bandhan 2019 Wishes: रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status)

या दिवशी एसटी स्थानकात बसची अधिक माहिती देण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच एसटी प्रवासी मित्र सुद्धा प्रवाशांना मार्गदर्शन करणार आहेत. रक्षाबंधनाचे औचित्य साधून एसटीचा कोणताही कर्मचारी सुट्टी घेणार नसून प्रवाशांची मदत करणार आहे.