Mumbai Rains Update: मुंबईसह पालघर, कोल्हापूर मध्ये मुसळधार पाऊस;  सखल भागात पाणी साचल्याने मुंबई पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
Rainfall in Mumbai City File Photo| (Photo Credit: ANI)

केंद्रीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह पश्चिम किनारपट्टी आणि मध्य महराष्ट्र, विदर्भामध्ये आज ( 8 सप्टेंबर) दिवशी पावसाची कोसळधार सुरूच आहे. मागील आठवड्याभरात महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाने जोर धरायला सुरूवात केली आहे. या पावसाच्या दमदार सरींमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक देखील मंदावल्याचं चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे. मुंबईत अनेक सखल भागात पाणी भरायला सुरूवात झाली आहे. तर पालघरमध्येही धरणं ओव्हर फ्लो झाल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापूरातही पुन्हा पावसाने धूमशान घालण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक बंधारे वाहून गेले आहेत तर पंचगंगा नदीच्या पातळीमध्येही वाढ झाली आहे. कोकणातही पावसाला जोर असल्याने मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावल्याचं चित्र आहे. मुंबईतही  साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक मंदावल्याचं चित्र आहे. मुंबई पोलिसांनी आपत्कालीन स्थितीमध्ये 100 या क्रमांकावर मदत मागण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पुरेशी काळजी घेत सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. मुंबईत पावसाचा कहर; रविवार, सोमवारी 'मुसळधार' पावसाची शक्यता

 

मुंबईमध्ये सचल भागात पाणीच पाणी

मुंबईमध्येही आज सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्याने सायन, चेंबूर, हिंदमाता, गोवंडी मानखुर्द परिसरात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. मुंबई पोलिसांकडून ट्वीटरच्या माध्यमातून मुंबईत पाणी साचलेल्या भागातील परिसराची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

BEST Bus Transport Tweet 

मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने बेस्ट बसनेही त्यांच्या वाहतूक मार्गांमध्ये काही ठिकाणी बदल केले आहेत.

मुंबई प्रमाणे नवी मुंबई, ठाणे, पालघर मध्ये पावसाचा जोर कायम आहे.  कोल्हापूरातही आज मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक बंधारे वाहून गेले आहेत तर पंचागंगा नदीच्या पातळीमध्येही कमालीची वाढ झाल्याने आता नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.