Rain | Twitter

मुंबई सह एमएमआर भागामध्ये 9-11 जून दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवणण्यात आला आहे. तळकोकणात आलेला पाऊस आता मुंबई शहरामध्ये दाखल होणार आहे आणि त्याच्या हजेरी सोबतच मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे सह आजूबाजूला पाऊस झोडपून काढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर ढगांची दाटी वाढत आहे त्यामुळे पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. मुंबईत 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, वेगळ्या भागात 150 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाळ्याची आशादायक सुरूवात होण्याचा अंदाज आहे.

मुंबई मध्ये मुसळधारेचा अंदाज

महाराष्ट्रामध्ये काल मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान यंदा उन्हाळ्यात कमालीचा उकाडा सहन केल्यानंतर आता सार्‍यांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. मुंबई सह राज्यात आणि देशातही उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. त्यामुळे सारेच उष्णतेने हैराण आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता त्यांना शेतीसाठी पुरा दमदार पावसाची अपेक्षा आहे.