Mumbai Rain and Traffic Updates: मुंबई सह कोकण आणि महाराष्ट्रातील इतर परिसरात मागील काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस आता पुन्हा दमदारपणे कोसळत आहे. काल (2 सप्टेंबर) पासून अधून मधून कोसळणार्या पावसाचा जोर आता वाढला आहे. यामध्ये मागील काही तासात मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याने सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. यामध्ये हिंदमाता, सायन या भागांचा समावेश आहे. परिणामी मुंबईची लाईफलाईन असणार्या मुंबई लोकल आणि रस्ते वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. मुंबईत बेस्ट बसनेही (BEST Bus) पाणी साचलेल्या अनेक भागांमध्ये त्यांच्या बसच्या मार्गांमध्ये बदल केले आहेत. Maharashtra Monsoon Forecast 2019: पुढील 48 तासांत विदर्भासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबईतही पावसाची कोसळधार सुरुच राहणार
मुंबईत रस्ते वाहतूकीसाठी अनेक मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. मागील काही दिवसात बेस्ट बसने तिकीटात दर कपात केल्याने अनेक मुंबईकरांनी बेस्टने प्रवास करण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र गणेशोत्सव आणि साचलेल्या पाण्यामुळे बेस्टने त्यांच्या काही मार्गांमध्ये बदल केले आहेत.
बेस्ट ट्वीट
BEST Bus routes diverted due to #waterlogging today. Position at 9.00 hrs. pic.twitter.com/6UVeav02kp
— BEST Bus Transport (@myBESTBus) September 3, 2019
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तास मुंबई सह कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.