Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Mumbai Rain Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

येत्या काही 24 तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मुंबईतील सर्व शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र Darshana Pawar | Aug 03, 2019 01:18 PM IST
A+
A-
Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

रात्रीपासून मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसंच रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत. याचा परिणाम निश्चितच रेल्वे, रस्ते वाहतूकीवर झाला आहे. तसंच येत्या  24 तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मुंबईतील सर्व शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

आज समुद्रात भरतीची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबईकरांनी सुरक्षित राहण्याचे, गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसंच आत्पकालीन परिस्थितीत 100 नंबर वर कॉल करण्याचेही ट्विटद्वारे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. (येथे पहा पावसाचे लाईव्ह अपडेट्स)

BMC ट्विट:

Mumbai Police ट्विट:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत सांगितले होते.


Show Full Article Share Now