Rains | File image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला मान्सून आता बरसायला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज (15 जून) मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आता हळूहळू पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे शहर परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात. त्यानुसार पुढील काही तास मुंबई आणि उपनगरामध्ये मुंबईकरांना पावसाचा आनंद लुटता येणार आहे. दरम्यान पवई, विलेपार्ले, अंंधेरी मध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाणे शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल; पश्चिम किनारपट्टीवर जोर वाढणार : हवामान खात्याचा अंदाज.

दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही तास दिवस महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाला जोर येऊ शकतो. अशामध्ये मुंबईकरांनाही पावसाचा आनंद लुटता येणार आहे. मात्र मुंबईत सध्या कोरोना व्हायरसचं थैमान असल्याने नागरिकांनी विनाकारण पावसात भिजणं टाळा असा सल्ला देखील आरोग्य विभाग, राज्य सरकारने दिला आहे.

मुंबईमध्ये पाऊस

अंधेरी एस व्ही रोड येथील दृश्य  

दरम्यान सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाला जोर आहे. तर मध्य मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आभाळ दाटून आलं आहे. दरम्यान यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सरासरीच्या 100% पाऊस पडणार आहे. 11 जूनला मान्सून दाखल झाल्यानंतर आता त्याची कोकणात धुव्वाधार बॅटिंग सुरू झाली आहे.