Representational Image (Photo Credit: IANS)

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai)पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात पावसामुळे नागरिकांमध्ये निराशा दिसून येते आहे. मात्र मुंबई महापालिकेने (Mumbai BMC)अतिमुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तसेच गणेशोत्सव काळात गणपती विसर्जनासाठी नागरिक समुद्र किनारी जातात. त्यामुळे पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांनी समुद्राच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे सुद्धा सांगण्यात आले आहे. त्याचसोबत ज्या ठिकाणी पाणी साचण्याची संभाव्यता असते तेथे ही नागरिकांनी काळजी घ्यावी.(Mumbai Rain: मुंबई, ठाणे आणि पालघर शहरात मुसळधार पाऊस; हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट)

BMC ट्वीट:

महापालिकेने आज शाळा बंद असणार असल्याची ही सुचना दिली आहे. शाळेत पोहचलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी योग्य ती उपाययोजन करण्यात आल्याचे काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगतले आहे.

मात्र पावसाळ्याच्या काळात कोणतीही मदत लागल्यास मुंबई महापालिकेने 1916 हा क्रमांक नागरिकांसाठी सुरु केला आहे. तसेच मुंबईत अतिमुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मुंबईतील दादर, सायन आणि भायखळा परिसरात काल रात्रीपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने वाहतुक कोंडी आणि पाणी साचले आहे. तसेच गेल्या 21 तासांपासून ते आता पर्यंत 13mm पावसाची नोंद मुंबईत करण्यात आली आहे.