Photo Credit: Pixabay

Mumbai Rain Alert: हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावासचा यलो अलर्ट जारी(Mumbai Rain Alert) करण्यात आला आहे. 18 आणि 19 जुलै हा मुंबईसाठी अधिक पावसाचा (Heavy Rain) असणार आहे. कारण, त्याला पश्चिमेकडील वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे. त्याचबरबोर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आज कोकणसह मध्य महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Mumbai Weather)आहे. (हेही वाचा: Nanded Rain: नांदेड जिल्ह्यातील खैरगाव येथे पुराच्या पाण्यात अडकले शालेय विद्यार्थ्यी, 25 हून अधिक विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका)

राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. सध्या कुठं जोरदार पाऊस कोसळतोय. तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai) पावसानं उघडीप दिली आहे. शिअर झोनच्या प्रभावामुळे मुंबईत गेल्या 2 दिवसात पाऊस पडला नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, आता तो उत्तरेकडे सरकल्याने आज दुपार आणि संध्याकाळपासून पुढील 24 ते 36 तासात मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर