
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील मंकी हिल आणि कर्जत दरम्यान असलेल्या तिसऱ्या मार्गावर काही तांत्रिक दुरुस्तीच्या कारणास्तव 15 जानेवारी पर्यंत पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईची सुचना आधीच प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर पावसाळ्याच्या वेशी सुद्धा मंकी हिल ते कर्जत मार्गिकेवरील रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते.
सीएसएमटी-पंढरपूर-सीएसएमटी, पनवेल-पुणे-पनवेल आणि अन्य पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र कोयना एक्सप्रेस पुणे येथून सुटणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पावसाळ्यात झालेल्या रेल्वे मार्गिकांचे नुकसान अद्याप भरुन काढणे बाकी आहे. त्यामुळेच किरकोळ काम पूर्ण करण्यासाठी 15 जानेवारी पर्यंत गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामाकरिता मंकी हिल ते कर्जतदरम्यान एक्स्प्रेस-पॅसेंजर गाड्यांसाठी प्रतितास 20 किलोमीटरची वेगमर्यादाही आखली आहे.तर पुणे-पनवेल-पुणे ही गाडी 15 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजगर गाडी 2 जानेवारी ते 4 जानेवारी आणि 9 ते 11 जानेवारी पर्यंत धावणार नाही आहे. त्याचसोबत भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस मनमाड-दौंडमार्गाने वळवण्यात आली आहे.(Indian Railway: नवीन वर्षात रेल्वे तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता; प्रवाशांच्या खिशाला बसणार चाप)