कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र अनलॉक 5 च्या टप्प्यात हळूहळू ही रेल्वेसेवा पूर्वपदावर येत आहे. त्यात आजपासून मुंबईपासून (Mumbai) पुणे (Pune), नागपूर (Nagpur), गोंदिया (Gondia) आणि सोलापूर (Solapur) इन्टरसिटी एक्सप्रेस (Intercity Express) सुरु झाली आहे. प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असून यामुळे त्यांचा जिल्ह्यांतर्गत प्रवास सुखकर होणार आहे. लॉकडाऊनमुळे ही रेल्वेसेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र प्रवाशांनी देखील योग्य ती काळजी घ्यावी आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यामुळे नागरिकांनी देखील रेल्वे प्रशासनाला सहकार्य करत दिलेल्या नियमांचे उल्लंघन करु नये. त्यासाठी 'हे' असतील महत्त्वाचे नियम
1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ,नागपूर,पुणे, गोंदिया, आणि सोलापूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांमधून केवळ तिकीट बुक केलेले आणि ज्यांच्याकडे निश्तिच तिकीट (Confirmed Tickets) प्रवासीच प्रवास करु शकणार आहेत. मुंबई लोकलच्या फे-या वाढवाव्यात; मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या सूचना
2. कोरोना व्हायरस (COVID19) संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आपले गंतव्य स्थान आणि प्रवासादरम्यान SOP शी संबंधित नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागणार आहे.
3. निश्चित तिकीट असले तरीही प्रवाशांना नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.
4. प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच सॅनिटायजर जवळ बाळगावे.
दरम्यान जिल्ह्यांतर्गत रेल्वे सेवा सुरु झाली असली तरीही मुंबई लोकल सेवा अद्याप सुरु झालेली नाही. त्यात राज्य सरकार हळूहळू एक एक सेक्टर सुरु होत असल्याने रोजचा प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या देखील वाढणार आहे. यामुळे लोकलच्या फे-या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांसाकडून करण्यात येत आहे.