Mumbai Pune Expressway Traffic Update: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कार पेटली; घाट परिसरात वाहनांच्या 10 किमी लांब रांगा
Traffic | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर आग लागल्याची घटना आज समोर आली आहे. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीत अजून भर पडली आहे. बोरघाटामध्ये (Borghat) सुमारे 10 किमी लांब वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या आहेत. आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने खोपोली जवळ पुणे लेन वर या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारला आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.

शनिवार- रविवारला जोडून आता 1 मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी आल्याने अनेक जण फिरायला बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी भल्या पहाटेपासून आहे. त्यामध्ये ही कार पेटल्याची घटना समोर आल्याने अजूनच कूर्मगतीने वाहनं पुढे जात आहेत. खंडाळा बोगदा भागामध्ये पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 10-10 मिनिटांचा ब्लॉक घेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत. Palghar Bus Fire: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या बसने घेतला अचानक पेट, थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव .

पहा मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहेत. तीन दिवस हीच परिस्थिती राहणार असल्याने पोलिसांची देखील वाहतूक कोंडी सोडवताना दमछाक होत आहे.