
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर आज पुन्हा अपघातामुळे वाहतूक कोंडी पहायला मिळाली आहे. आह बोरघाटात ट्रक आणि ट्रेलर मध्ये अपघात झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक आणि ट्रेलर दोन्ही उलटल्याने वाहनांचा मोठा खोळंबा झाल्याचं पहायला मिळालं आहे.
दरम्यान मुंबई आणि पुण्याकडे जाणार्या गाड्या घाटात रखडल्याने आता पोलिसांकडून पर्यायी मार्गाने वाहनं रवाना केली जात आहेत. तसेच ट्रक आणि ट्रेलर यांनाही हटवण्याचं काम सुरू आहे. खालापूर टोल नाक्याजवळ सध्या मुंबई कडे येणार्या वाहनांची मोठी रांग बघायला मिळत आहे. हे देखील नक्की वाचा: Uber Cab चालक मुंबई-पुणे एक्सप्रेस वर गाडी चालताना डुलक्या काढत असल्याने प्रवासी तरूणीला चालवावी लागली गाडी (Watch Video).
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मागील काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सध्या या महामार्गावर दुरूस्तीचे देखील काम सुरू आहे. हे 'मिसिंंग लिंक प्रोजेक्टच' काम आहे. या कामाला पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वीच खोपोली एक्झिट जवळ कारला टॅंकरने ठोकल्याची देखील घटना समोर आली होती. त्यामध्ये 3 जण दगावले होते.