मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Express Highway) चारचाकी वाहनांसाठी ताशी 120 kmph वेगाने गाडी चालवण्यास परवानगी देण्याचा ठराव केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला होता. मात्र गेल्या 60 दिवसांत एक्सप्रेस हायवेवरील गाड्यांच्या वेगाबाबत पाहिले असता 120 kmph चा स्पीड गाडी चालवण्यासाठी योग्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ता पुन्हा एक्सप्रेस हायवेवर वाहनांसाठी ताशी वेग 80kmph असणार असल्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
एक्सप्रेस हायवेवरील वरिष्ठ पोलीस विजय पाटील यांनी मुंबई मिरर यांना सांगताना असे सांगितले की, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर गाड्यांच्या वेगाबाबत पुढील आठवड्यात अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पुन्हा एकदा 80kmph वेग ठेवण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत काही एनजीओ सुद्धा एक्सप्रेस हायवेवरील गाड्यांच्या वेगाबाबत काम करत आहेत. त्यांनीसुद्धा एक्सप्रेस हायवेवरील सध्या ठेवण्यात आलेला गाड्यांचा वेग चालकांसाठी सुरक्षित नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
परिरस प्रोजेक्टचे मुख्य रनजित गाडगीळ यांनी असे म्हटले आहे की, हायवेवरील वाहनांसाठी ठरवण्यात येणार वेग हा वाहतूक कोंडी आणि रस्त्याचे स्ट्रक्चरल पाहून ठरवला जातो. मात्र काही ठिकाणी 80kmph हा वेग तसाच ठेवणे थोडे कठीण काम आहे.(मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर आता 120 KMPH वर चालवा गाडी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ठरावाला मंजुरी)
सेव्हलाइफ फाउंडेशन या एनजीओ तर्फे सुद्धा रस्ते वाहतूक सुरक्षितताबाबत काम एक सर्व्हे करत असल्याचे म्हटले आहे. या सर्व्हेनुसार गाडी अतिवेगाने चालवणे हे अतिधोकादायक असून 65 टक्के चारचाकी चालक गाडीच्या वेगाकडे दुर्लक्ष करतात. त्याचसोबत 42.3 टक्के लोक गाडी चालवताना सीट बेल्ट सुद्धा हायवेवर चालवाता घालत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच रस्ते अपघात जास्त होण्याची शक्यता असल्याचे ही सांगण्यात आले आहे. तर 38 टक्के रस्ते अपघात हे एक्सप्रेस हायवेवर 80 kmph पेक्षा अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे झाले आहेत.