Building | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Property Registrations: मुंबई (Mumbai) शहरामध्ये जुलै 2024 मध्ये तब्बल 12,160 मालमत्तेची नोंदणी (Property Registrations) झाली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीत 1,055 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा झळा आहे. ही नोंदणी 2023 मधील याच कालावधीच्या तुलनेत नोंदणीमध्ये वर्ष-दर-वर्ष (YoY) लक्षणीय 19% वाढ आणि महसुलात 27% वाढ दर्शवते. नाइट फ्रँकने (Knight Frank Report) आपल्या ताज्या अहवालात याबाबत माहिती दिली आहे.

खरेदीदारांच्या आत्मविश्वासामुळे वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांतही मालमत्तेमध्ये सातत्यपूर्ण विक्री झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, यंदाच्या जुलैमध्ये झालेली मालमत्तांची नोंदणी ही, गेल्या दशकात कोणत्याही जुलैमध्ये झालेल्या नोंदणीपेक्षा सर्वाधिक आहे. मालमत्तेच्या व्यवहारातील ही वाढ वाढलेली आर्थिक सुबत्ता आणि मुंबईतील रहिवाशांमध्ये घरमालकीसाठी वाढलेली पसंती दर्शवते.

जुलै 2024 मध्ये, निवासी युनिट्सची एकूण नोंदणी 80% होती, ज्यामुळे शहरातील घरांची मागणी वाढल्याचे दिसते. विक्रमी मालमत्ता नोंदणी आणि महसूल संकलनासह मुंबईने सात महिन्यांचा सर्वोत्तम कालावधी अनुभवला. जानेवारी ते जुलै, 2024 पर्यंत, शहराने 84,653 मालमत्ता नोंदणी नोंदवल्या. याआधी 2023 मध्ये याच कालावधीतील 72,713 नोंदणींपेक्षा यंदा 16% वाढ झाली आणि 6,929 कोटी रुपयांची कमाई झाली. कमाईच्या बाबतीत मागील वर्षीच्या 6,452 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी 7% ने वाढ झाली.

मुंबईमध्ये दरमहा सरासरी 12,093 मालमत्तांची नोंदणी झाली. 2023 मध्ये ही संख्या प्रति महिना 10,388 होती. सरासरी मासिक महसूल गतवर्षीच्या 922 कोटी रुपयांच्या तुलनेत, 2024 मध्ये 7% वाढून 987 कोटी रुपये झाला. नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, शिशिर बैजल म्हणाले, मालमत्तेच्या किमती जास्त असूनही, आर्थिक सुबत्ता, घरमालकीची वाढती पसंती आणि अनुकूल व्याजदर यामुळे घर खरेदी करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढत राहतो. (हेही वाचा: Mumbai Road Accidents: मुंबईत यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान रस्ते अपघातात 164 जणांचा मृत्यू; वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीत समोर आली माहिती)

जुलै 2024 मध्ये, 500 चौरस फूट ते 1,000 चौरस फूट दरम्यानच्या अपार्टमेंटच्या नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, जी सर्व मालमत्ता नोंदणीपैकी 49% आहे. 500 चौरस फुटांपर्यंतच्या अपार्टमेंटची नोंदणी 33% होती. पश्चिम उपनगरातील मालमत्ता नोंदणीचा ​​वाटा जुलै 2023 मध्ये 57% वरून जुलै 2024 मध्ये 50% वर घसरला. ध्य उपनगरांमध्ये जुलै 2023 मधील 29% वरून जुलै 2024 मध्ये 41% पर्यंत वाढ झाली.