Power Lines | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दक्षिण मुंबई (South Mumbai) परिसरातील विजपुरवठा रविवारी (27 फेब्रुवारी) सकाळपासून खंडीत (Mumbai Power Outrage) झाला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक ठिकाणी बत्ती गुल आहे. रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. प्रामुख्याने ळे भुलेश्वर, काळबादेवी, सायन, माटुंगा आणि दादर परिसरात सध्या वीज गायब झाल्याने नागरिकांची गैससोय झाली आहे. तर व्यवसाय, उद्योग आणि सेवा देणाऱ्या यंत्रणांचा खोळंबा झाला आहे. मात्र, ग्रीड फेल्युअरमुळे सकाळपासून संपूर्ण दक्षिण मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्याचे एमएसीबी (MSEB ) द्वारे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) पीआरओ विभागाने माहिती देताना सांगितले की, मुलुंड-ट्रॉम्बेवरील MSEB 220kv ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्यामुळे मुंबईच्या बहुतांश भागांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान, खंडीत झालेला वीजपुरवठा कधी सुरळीत होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (हेही वाचा, Power Crisis: महाराष्ट्रात निर्माण होणार मोठे वीज संकट? महावितरणला वीज पुरवठा करणारे 13 औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद)

ट्विट

ट्विट

मुंबई महापालिकेने माहिती देताना म्हटले की, काही तांत्रिक अडचणींमुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमची टीम मैदानात उतरली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. वीजपुरवठा तासाभरात सुरळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशी भावनाही महापालिकेने व्यक्त केली आहे.