![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/07/Mumbai-Police-380x214.jpg)
मुंबई पोलिस दलातील (Mumbai Police) महिलांसाठी यंदाचा महिला दिन (International Women's Day) खास ठरला आहे. आता मुंबई पोलिस दलातील महिला कर्मचार्यांना (Mumbai Women Cops) 8 तासांची शिफ्ट आजपासून पुन्हा सुरू होत आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हे खास गिफ्ट त्यांच्या महिला कर्मचार्यांना दिले आहे. महिलांसाठी खाजगी आणि कामातील आयुष्यातील समतोल राखता यावा याकरिता हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून काम पाहत असताना संजय पांडे यांनी या वर्षी जानेवारीत आठ तासांच्या ड्युटी शेड्यूलची सुरुवात केली होती. पण कोरोना संकटामुळे पोलिसांना 24 तासांची ड्युटी करावी लागत होती पण आता पुन्हा 8 तासांची शिफ्ट करण्यात आली आहे. महिला कर्मचार्यांसाठी याकरिता दोन पर्याय असणार आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये 3 शिफ्ट्स आहेत. पहिला पर्याय हा सकाळी 8 ते 3, दुपारी 3 ते 10 आणि रात्री 10 ते सकाळी 8 अशी आहे तर दुसऱ्या पर्यायामध्ये सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा शिफ्टच्या वेळा आहेत. नक्की वाचा: Vehicle Towing: मुंबईत वाहतूक पोलिसांना एका आठवड्यासाठी वाहन टोईंग करणे थांबण्याचा पोलिस आयुक्तांचा आदेश .
मुंबईत 8 तासांची शिफ्ट सर्वप्रथम 5 मे 2016 रोजी देवनार पोलीस ठाण्यात लागू करण्यात आली होती. देवनार पोलीस ठाण्यात तैनात असलेले हवालदार रवींद्र पाटील यांनी तत्कालीन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी संपर्क साधून डायनॅमिक वेळापत्रकांबाबत सादरीकरण केले. त्यानंतर पडसलगीकर यांनी चार सदस्यीय समिती स्थापन करून योजना राबविण्यासाठी तीन टप्पे निश्चित केले होते.