सेल्फीच्या (Selfie) नादात अनेकांचा जीव गेल्याच्या कित्येक घटना आपण पाहत असतो. उंच इमारतीवर, समुद्र ठिकाणी, उंच गड किल्ल्यांवर, अरुंद रस्त्यांवर अशा अनेक धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याच्या नादात स्वतःवरील नियंत्रण कसे सुटते आणि ती सेल्फी कशी जीवावर बेतते हे समजतही नाही. याचबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक ट्विट केले आहे.या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी एक थरारक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सेल्फी घेण्याच्या नादात उंच इमारतीवरून खाली पडताना दिसत आहे.
Attempt for the most daring selfie? Or just another irresponsible adventure? Whatever this was for, it clearly wasn’t worth the risk! #SafetyFirst pic.twitter.com/vzBYEZs54Y
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 2, 2019
पावसाळ्याचे दिवस आहेत, हा व्यक्ती उंच इमारतीवर सेल्फी घेण्यासाठी चढला आहे. अचानक त्याचा पाय घसरतो अथवा तोल जातो, आणि उंच इमारतीवरून तो खाली पडतो. व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत त्याचा फोनही खाली पडताना दिसत आहे. ‘हटके सेल्फी घेण्याचे खूळ अथवा काहीतरी साहसी कृत्य करण्याची ओढ, काहीही असो मात्र ही गोष्ट जीवाशी खेळणारी ठरू शकते’. अशा आशयाचे हे ट्विट आहे. (हेही वाचा: नळदुर्ग परिसरात सेल्फीच्या नादात बोट उलटली; तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू)
ही घटना नेमकी कुठे घडली याबद्दल मुंबई पोलिसांनी कोणती माहीती दिली नाही, मात्र अशाप्रकारे सेल्फी घेण्याचा घटना हल्ली सर्वत्रच आढळतात. त्यामुळे तुम्ही तरी या नादात आपल्या जीवावर बेतेल असे कोणतेही कृत्य करू नका असे मुंबई पोलिसांना सांगायचे आहे. दरम्यान, सीएनएनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात, जगभरातील 259 लोक सेल्फी घेताना मरण पावले असल्याची माहिती देण्यात आली आहे. फक्त भारतामध्ये 2011 पासून 159 व्यक्ती सेल्फी घेताना मरण पावल्या आहेत.