Ananta Chaturdashi 2024: अनंत चतुर्थी (Anant Chaturdashi 2024) उत्सवासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) पूर्णपणे सज्ज असून गणपती विसर्जनाचा (Ganpati Visarjan 2024) उत्सव सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी व्यापक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी विसर्जनाच्या दिवशी शहरात 2,900 पोलीस अधिकारी आणि 20,500 हवालदारांसह एकूण 23,400 पोलीस अधिकारी तैनात केले आहेत.
याव्यतिरिक्त, 40 पोलिस उपायुक्त (DCP) आणि 50 सहायक पोलिस आयुक्त (ACP) सुरक्षा कार्यांवर देखरेख करतील. याशिवाय, वाढीव सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलीस दल, जलद कृती दल आणि दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आली आहेत. संपूर्ण मुंबईतील विसर्जन मिरवणुकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार आहे. (हेही वाचा - Ganesh Visarjan In Mumbai: लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी चं आज मंडपात दर्शनाचा शेवटचा दिवस; पहा किती वाजता बंद होणार मुखदर्शन)
7 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या गणपती उत्सवाची सांगता 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाने होईल. अनंत चतुर्दशीला मूर्तींचे विसर्जन करून 10 दिवस चालणारा गणेशोत्सव संपणार आहे. मुंबई पोलिसांनी गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली आहे. मूर्तींच्या विसर्जनाच्या भव्य मिरवणुकांचे व्यवस्थापन करण्यासाठी संपूर्ण मुंबईत डायव्हर्जन केले जाईल.
उत्तर आणि दक्षिण मुंबई दरम्यान सुरळीत प्रवास करण्यासाठी कोस्टल रोड 18 सप्टेंबरपर्यंत 24 तास खुला राहील. तथापि, पोलिसांनी लोकांना खाजगी वाहनांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे आणि गर्दी टाळण्यासाठी लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेसचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.