Mumbai Ganpati 2024 | File Photos

दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाचा क्षण जवळ येऊन ठेपला. 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी (Ananta Chaturdashi)  दिवशी बाप्पाचं विसर्जन होणार आहे.  हिंदू धर्मात रीतीनुसार, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बाप्पाचं आगमन होते. त्यानंतर दीड, पाच, सात,दहा दिवसांनी विसर्जन केले जाते. आता 10 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीला होणार आहे. मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी धूम असते. गणेशोत्सवाचे दहाही दिवस मुंबई मध्ये दिवस रात्र बाप्पाच्या दर्शनाने वातावरण चैतन्यमय असते. घर,काम, संसार सांभाळत अनेक गणेशभक्त अहोरात्र सार्वजनिक मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये सहभागी असतात. मुंबई मध्ये गल्लोगल्ली बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देशा-परदेशातून भाविक हमखास हजेरी लावतात. मुंबई मध्ये लालाबाग, परळ भागात हा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात होत असतो. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja), मुंबईचा राजा (Mumbaicha Raja) , चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpoklicha Chintamani) याचं विशेष आकर्षण आहे. या बाप्पाचं रूप पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक तासनतास रांगेत उभे असतात. आता दहा दिवसांच्या सेवेनंतर हे बाप्पा आता निरोप घेण्यासाठी आता सज्ज झाले आहेत.

मुंबई मध्ये अनंत चतुर्दशी दिवशी  विसर्जनाच्या  पार्श्वभूमीवर आता आता मुंबई मध्ये लालबागच्या राजाचं चरणस्पर्श रांग बंद करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता ही रांग बंद झाली आहे तर मुखदर्शनाची रांग आज (16  सप्टेंबर)  रात्री 12:00 वाजता बंद करण्यात येणार आहे. बाप्पा 17-18 तासांच्या भव्य मिरवणूकीनंतर गिरगाव चौपाटी वर विधिवत पणे खोल समुद्रात नेऊन विसर्जित केला जातो.

लालबागचा राजा  2024

 

View this post on Instagram

 

A post shared by LalbaugchaRaja (@lalbaugcharaja)

चिंचपोकळीचा चिंतामणी देखील 17 सप्टेंबरला भक्तांचा निरोप घेणार आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार आहे. तर संध्याकाळी 6 वाजता चरणस्पर्शाची रांग बंद होणार आहे. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीला जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा करण्यात आला होता. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदा हे 105 वं वर्ष आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी 2024

 

View this post on Instagram

 

A post shared by Chinchpoklicha Chintamani (@chinchpoklichachintamani)

मुंबईचा राजा, गणेशगल्लीचा गणपती

 

View this post on Instagram

 

A post shared by ©Mumbaicha Raja, Ganeshgalli (@raja_mumbaicha)

गणेशगल्लीचा गणपती अर्थात मुंबईचा राजा 17 सप्टेंबरला सकाळी 8.15 ला निघणार आहे. मुख्य प्रवेशद्वारावर तो 11.30 च्या सुमारास येणार आहे. लालबाग वरून तो गिरगाव चौपाटीला विसर्जनासाठी रवाना होणार आहे.