DCP Saurabh Tripathi | (Photo Credit : You Tube)

पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या सौरव त्रिपाटी (Saurabh Tripathi) या अधिकऱ्यास मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) फरार (Absconding) घोषीत करण्यात आले आहे. क्राईम इंटेलिजन्स युनिटने (Crime Intelligence Unit) ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सैरव त्रिपाटी हे सध्या मुंबई पोलीस दलात कर्तव्यास आहेत. अंगाडिया व्यवसायीकाला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेणे आणि खंडणी वसुल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. सौरव त्रिपाटी यांच्यासर आणखी चार पोलिसांवर खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, ते अधिकारी दर्जाचे कर्मचारी असल्याचे समजते.

अंगाडिया व्यावसायिकाला धमकावून त्यांना ताब्यात घेणे आणि खंडणी वसुल केल्याचे प्रकरण पुढे येताच त्रिपाटी यांची बदली करण्यात आली. मात्र, पुढे या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली आणि या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली. अटक करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या कसून झालेल्या चौकशीत सौरभ त्रिपाटी यांचे नाव पुढे आले. त्यानंतर या प्रकरणात त्रिपाटी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. (हेही वाचा, Mumbai: बलात्काराच्या गुन्ह्यात आरोप टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच अटक)

राज्यात कायदा व सुव्यस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. महाविकासआघाडी सरकार कायदा व सुव्यस्थेच्या बाबतीत सपशेल अयशस्वी झाले आहे असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत असतो. त्याला सरकार सरकारच्या परीने प्रत्युत्तर देत असते. मात्र, आता क्राईम इंटेलिजन्स युनिटने डीसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास फरार घोषीत केल्याने विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला आहे.