Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेतील आणि महत्त्वाच्या कामांसाठीच प्रवासाची मुभा देण्यात आली होती. विशेष म्हणजे अशा वाहनांसाठी लाल, पिवळा, हिरवा असे स्टिकर्स सह कलर कोड सिस्टम (Color Code System) सुरु करण्यात आली होती. मात्र मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) लागू केलेला हा नियम आता बंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे.

लाल, पिवळा, हिरवा असे Emergency Stickers चे वर्गीकरण बंद केले जात आहे. मात्र वाहनांची तपासणी होणार आहे. त्यामुळे अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणे टाळून आम्हाला सहकार्य कराल, अशी आशा आहे, असे मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (काय होती कलर कोड स्टिटम? जाणून घ्या)

Mumbai Police Tweet:

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वाहनासांठी कलरकोड सिस्टम लागू करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले होते. मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला असून कलरकोड स्टिकर लावणे बंधनकारक नाही. यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लाल, भाजीपाला वाहनांसाठी हिरवा आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठी पिवळा रंग असे वर्गीकरण करण्यात आले होते. दरम्यान, राज्यात आता जिल्हाबंदी असून जिल्हाअंतर्गत प्रवासावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत प्रवास करायचा असल्यास आता ई-पास ची आवश्यकता असणार आहे.