Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये टार्गेट करण्यात आलेलं एक ठिकाण म्हणजे छाबड हाऊस (Chabad House). आता पुन्हा या ठिकाण दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे संकेत मिळताच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) छाबड हाऊस बाहेरील सुरक्षा वाढवली आहे.Maharashtra ATS ने पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे छाबड हाऊसचा फोटो आढळला आहे.

Maharashtra ATS ने केलेल्या कारवाई मध्ये Mohd Imran Mohd Yunus Khan आणि Mohd Yunus Mohd Yakub Saki या दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी करताना त्यांच्याकडे मुंबईतील छाबड हाऊसचे काही गूगल इमेजेस आढळले आहेत. यानंतर आता यंत्रणा अलर्ट मोड वर आली आहे.

पहा ट्वीट

पुणे पोलिसांच्या कारवाईमध्ये या दोघा दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे जिवंत काडतुसांसह ड्रोन बनवण्याचे साहित्य देखील आढळले आहे. NIA च्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये असलेल्या या दहशतवाद्यांच्या ताबा आता महाराष्ट्र एटीस कडे आहे.

मूळचे मध्य प्रदेशच्या रतलामचे असलेले हे दोघे सुफा नावाच्या मध्य प्रदेश येथील दहशतवादी संघटनेसोबत काम करत होते. हे दोघे इसिसकडून प्रेरित असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. जयपूर येथे स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. अशी माहिती देखील मुंबई पोलिसांनी दिली आहे.