मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे समस्या घेऊन भेटण्यासाठी आलेल्या बाप-लेकीला नकार देत पोलिसांनी घेतले ताब्यात
मातोश्री बंगला (Photo Credits-ANI)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे मधील मातोश्री बंगल्याच्या येथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्यासह त्याच्या मुलीला पोलिसांनी नकार देत ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर शेतकरी मुलीसह त्यांच्या समस्या घेऊन उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र त्यांना गेटजवळच पोलिसांनी अडवत ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांकडून बाप-लोकीला कोणत्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले हे अद्याप अस्पष्ट असून यावर प्रसार माध्यमांसोबत बोलण्यास सुद्धा नकार दिला आहे. याबाबत एबीपी माझा यांनी अधिक माहिती दिली आहे.

पनवेल येथून आलेल्या सदर शेतकऱ्याचे नाव देशमुख असे आहे. देखमुख यांच्यावर कर्ज असून बँक त्यांची अडवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बँकेकडे सर्व कागदपत्र सादर करुन सुद्धा त्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप देखमुख यांनी केला आहे. याच बाबत एक फाइल घेऊन देखमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र मातोश्री बाहेर दोन तास उभे राहून सुद्धा त्यांना भेट घेता आली नाही. पण पोलिसांनी त्यांना उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास नकार घेत त्यांना ताब्यात घेतले.(उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल यांनी दिली पक्ष सोडण्याची धमकी)

तर पोलिसांकडून असे सांगण्यात आले आहे की, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित राहून लोक उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्यास तर अवघड होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण देखमुख यांच्यावर कर्जाची डोंगर असून त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात त्यांनी अर्ज सादर केला असल्याचे ही देखमुख यांनी म्हटले आहे.