मुंबई मध्ये मालाडच्या SV Road वर पोलिसांचा छापा; कोविड 19 नियमावलीचं उल्लंघन केल्याने 10 जणांना अटक
(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई मध्ये कोविड 19 च्या कडक निर्बंधांमधून (COVID-19 Norms) नागरिकांना काही अंशी मुभा मिळाली असली तरीही कोरोनाचं संकट पूर्णपणे टळले नसल्याने काही ठिकाणी नियमावली कायम आहे.मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अशाच काही अति उत्साहींवर कारवाईचा बडगा उचलला आहे. आज मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड (Malad), एस व्ही रोड (SV Road) वर असलेल्या एका बार वर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 10 पुरूषांना अटक झाली आहे. यांच्याकडून कोविड19 नियमावलीचं उल्लंघन झाल्याचे आरोप आहेत.

गुरूवार (5 ऑगस्टला) मुंबई पोलिसांनी मिळालेल्या टीप नुसार रात्री 9.45 च्या सुमारास धाड टाकत कारवाई केली. यावेळी 4 महिला कर्मचार्‍यांची सुटका करण्यात आली. 'राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचं बार कडून उल्लंघन झाल्याने कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (नक्की वाचा: COVID-19 चे नियम धाब्यावर बसवत ठाण्यात सुरू असलेल्या डांस बार प्रकरणी नौपाडा, वर्तक नगर पोलिस स्टेशन हद्दीतील 2 सिनियर इन्सपेक्टर निलंबित, 2 ACP ची बदली).

PTI च्या वृत्तानुसार, DCP Vishal Thakur यांच्या टीम ने कारवाई केली आहे. 10 पुरूष ग्राहक बार मध्ये कारवाईच्या वेळेस होते त्यांना अटक करण्यात आली आणि 4 महिला त्यांना सर्व्ह करत होत्या त्यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणामध्ये आता पुढे कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठाण्यात काही दिवसांपूर्वी COVID-19 चे नियम धाब्यावर बसवत  सुरू असलेल्या डांस बार प्रकरणी नौपाडा, वर्तक नगर पोलिस स्टेशन हद्दीतील 2 सिनियर इन्सपेक्टर निलंबित करण्यात आले आहेत तर 2 ACP ना बदली करण्यात आले आहे.