मुंंबई पोलिसांंची कौतुकास्पद कामगिरी; उत्तर प्रदेश मध्ये दोन हत्या केलेल्या Wanted गुन्हेगाराला विलेपार्ले येथुन अटक
Mumbai Police Arrest UP Gangster (Photo Credits: Twitter)

भाजपा नेता राकेश शर्मा (Rakesh Sharma) आणि नोएडा येथील गौरव चंदेल (Gaurav Chandel) यांंची हत्या केलेल्या उत्तर प्रदेश मिर्ची गँगचा (Mirchi Gang)  प्रमुख आशू जाट (Ashu Jaat) याला हापूड पोलिसांनी मुंबई (Mumbai Police) गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने विलेपार्ले (Vileparle) येथून अटक केली आहे.  आशु वर अडीच लाखांंचे बक्षीस होते. या व्यतिरिक्त सुद्धा हत्या, चोरी आणि अपहरणासारखे 51 गुन्हे आशूवर दाखल आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आशू रुप बदलुन मुंबई मध्ये भाड्याच्या घरात राहत होता. दाढी वाढवल्याने त्याला ओळखणे शक्य नव्हते. तो जोगेश्वरी मध्ये भाजी विकण्याचा व्यवसाय करत होता. मागील आठवड्यामध्ये आशू मुंबईमध्ये लपून बसल्याची माहिती दिली होती ज्यानंंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने आणि उप निरीक्षक शरद जीने हे तीन दिवस भाजी विक्रेता म्हणून विलेपार्ले परिसरामध्ये गस्त घालत होते. तीन दिवस सर्व निरिक्षण केल्यावर काल आशुला अटक करण्यात आली ज्याबाबत पोलिसांंनी ट्विट करुन माहिती दिली.

मुंंबई पोलिसांंनी अटक केल्यावर आशूने उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष दलाकडून आपला एन्काऊंटर होईल अशी भीती व्यक्त केली आहे. शू आणि त्याचा भाऊ भोलू यांची 25 जणांची एक टोळी आहे. या टोळीचे नाव मिर्ची गँग असुन या टोळीतील चोर लोकांच्या डोळ्यात मिर्ची पावडर घालुन चोरी करण्याचा या टोळीचा रेकॉर्ड आहे.

मुंंबई पोलिस ट्विट

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील आपल्या गँगमधील एका व्यक्तीला आशुने फोन केला होता. या कॉलमुळे पोलिसांंना त्याचे ठिकाण ट्रॅक करता आले. याशिवाय मागील आठवड्यात त्याच्याविषयी उत्तर प्रदेश पोलिसांंकडुन माहिती देण्यात आली होती.सध्या पोलिसांंनी आशुला उत्तर पोलिसांंकडे सोपवले आहे.