Coronavirus: देशासह राज्यात कोरोना रुग्णांचा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावल्याचे दिसून आले आहे. परंतु मुंबईत 14 फेब्रुवारीला कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच कारणास्तव आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना एक आवाहन केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावीच. अन्यथ दुसऱ्या लॉकडाऊनची गरज भासू शकते.(National COVID Memorial: कोविड 19 मुळे जीव गमावलेल्यांच डिजिटल स्मारक nationalcovidmemorial.in)
किशोरी पेडणेकर यांनी पुढे असे ही म्हटले की, हा प्रश्न चिंतेचा असून बहुतांशजण लोकलमधून प्रवास करताना मास्क घालतच नाहीत. त्यामुळे नागरिकांनी खरंच काळजी घ्यायला हवी. नाहीतर आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये अडकावे लागेल. तसेच परत लॉकडाऊन करायचा हे आता नागरिकांच्या हातात असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.(Maharashtra Corona: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत 14 फेब्रुवारीला सर्वाधिक वाढ)
Tweet:
It's a matter of concern. Most people travelling in trains don't wear masks. People must take precautions else we'd head towards another lockdown. Whether lockdown will be implemented again, is in the hands of people: Kishori Pednekar, Mumbai Mayor on surge in COVID cases in city pic.twitter.com/IJgMVUJVJm
— ANI (@ANI) February 16, 2021
दरम्यान, भारतामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक मिळून देशातील 76.5% कोरोनाचे अॅक्टिव्ह रूग्ण असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान केरळ आणि महाराष्ट्र मिळून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 74% आसपास आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.