PUBG ख़ेळात वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर असं सांगण्यावरून रागाच्या भरात एका तरूणाने आत्महत्या केली आहे. डहाणूतील पालघरमध्ये हेमंत झाटे (Hemant Zate) या तरूणाने गळफास लावून त्याचं आयुष्य संपवलं आहे. हेमंत हा पबजी या ऑनलाईन खेळाच्या विळख्यात अडकला होता. या खेळाच्या आहारी जाऊनच त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं सांगितलं जात आहे. विशाखापट्टणम: PUBG खेळण्यास पालकांनी नकार दिल्याने 10 वी मधील विद्यार्थ्याने संपवले आयुष्य.
TOI च्या वृत्तानुसार, हेमंत हा 12 वी पास विद्यार्थी होता. 12 वी नंतर त्याने अॅग्रिकल्चर स्टडीज म्हनजे कृषिविषयक अभ्यास मध्ये पुढील अभ्यास सुरू केला आहे. हेमंतचे वडील पीठाच्या चक्कीवर कामावर होते. त्यामुळे हेमंतच्या शिक्षणाचा आर्थिक भार पीठ चक्की मालक चिराग मेहताने उचलला होता. मात्र ऑनलाईन गेमच्या नादात त्याचं अभ्यासावरील लक्ष उडालं होतं. PUBG Mobile Season 9 आजपासून झालं उपलब्ध; Royale Pass मुळे युजर्सना मिळणार भन्नाट फीचर्स.
चिराग मेहता यांनी पोलिस तक्रारीमध्ये हेमंतला 'पबजी' खेळाचं व्यसन होतं. तसेच या खेळाच्या नादापायी तो रात्रभर जागत होता. सोमवारी रात्री तो अस्वस्थ वाटत असल्याचं सांगत लवकर झोपायला गेला. त्यानंतर काही तासात त्याने गळफास घेतल्याचं समजलं. हेमंतच्या घरात कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.