130 Years Of Bandra Station (Photo Credits: Twitter)

130 Years of Bandra Railway Station:   मुंबईमध्ये हेरिटेज वास्तूंपैकी एक असलेल्या वांद्रे स्ठानकाला आता भारतीय पोस्ट तिकीटवरही स्थान मिळालं आहे. नुकतच अभिनेता शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) हस्ते या खास पोस्ट तिकीटाचं अनावरण करण्यात आलं आहे. वांद्रे पोस्ट तिकीट हे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते अ‍ॅड.आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे. लवकरच अजून काही पोस्ट तिकीटं आणली जाणार आहेत. वांद्रे रेल्वे स्थानकाला 130 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ हे पोस्ट तिकीट (Postal Cover on Bandra Railway Station) बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे.

मुंबईमधील वांद्रे स्टेशनला हेरिटज दर्जा मिळाल्यानंतर नुकतेच रेल्वेने या स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण केले आहे. पोस्ट तिकीट अनावरण्याच्या कार्यक्रमामध्ये नागरिकांना संबोधताना त्याने, 'आज इंटरनेट आणि डिजिटल माध्यमात वावरतानाही लोकांनी पोस्ट तिकीटाची वापर करावा असं आवाहन केलं आहे. तसेच रेल्वे सटेशनवर अनेकदा रोमांस केला आहे पण यापूर्वी कधी वांद्रे रेल्वे स्थानकावर आलो नव्हतो, आता पुन्हा नक्की येईन.' असं तो म्हणाला. नोकरीला कंटाळलात? मग स्वत:चे सरकारमान्य Post-Office सुरु करा, कमवा बक्कळ पैसा

पश्चिम रेल्वे Tweet

आशिष शेलार ट्वीट 

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टाला महसूल मिळावा म्हणून ही 'माय स्टॅम्प, माय पॉकेट' योजना जाहीर केली आहे. या योजनेमधून आशिष शेलार यांनी खास तिकीट बनवलं आहे.