Railway (Photo credits: PTI)

हार्बर मार्गावर आज (8मे) रात्री बांद्रा स्थानकावर गर्डर पाडण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर जवळजवळ पाच तासांचा हा ब्लॉक असणार असून हार्बर मार्गावरील रात्री 10.37 वाजता अंधेरी ही शेवटची ट्रेन असणार आहे. त्याचसोबत वांद्रे-अंधेरी-गोरेगाव येथून सीएसएमटी येथे जाण्यासाठी 11.04 वाजताची शेवटची ट्रेन असणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

डाऊन मार्गावर सीएसएमटी ते वांद्रे दरम्यान रात्री 10.54 ते 12.36 आणि 11.02 ते 11.38 वाजताच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पश्चिम- मध्य रेल्वेने प्रवास करता येणार आहे.(महाराष्ट्रात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता शिथिल)

तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्री 11.30 ते गुरुवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत काम सुरु राहणार आहे. त्यामुळे जलद मार्गावरील गाड्या सांताक्रुझ आणि माहिम स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.